बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे )कारंजा शहरातील ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे .जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबविण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे राज्य शासनाने दिले आहेत या उपक्रमाअंतर्गत ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे गेल्या 1 जानेवारी पासून विविध उपक्रम राबविल्या गेले .काल दिनांक 10 जानेवारी रोज सोमवार ला ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे चित्रकला व किल्ला शिल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली .या स्पर्धेला शाळेतील विद्यार्थ्यांन कडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला .1 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत हा उपक्रम ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे राबविण्यात येत आहे .आज या स्पर्धा नंतर जे .ई लस शाळेतील पहिली ते नववी या वर्गा पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली .ए .आर .सी पब्लिक स्कूल नेहमी अश्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात व राबवत राहणार या पासून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील असलेले गुण दाखविण्याचा मौका मिळतो असं मत शाळेच्या उपमुख्यधापिका सारिका सातपुरे यांनी व्यक्त केलं .या उपक्रम वेळी उपस्थित शाळेच्या उपमुख्यधापिका सारिका सातपूरे ,जेष्ठ शिक्षिका सारिका नासरे ,प्रदीप उके ,बुशरा पठाण ,स्नेहा मनवर ,नेहा चौधरी ,आकांशा यादव ,ललित मस्के ,उमेश साठवणे ,अमोल केलझलकर ,किसन मात्रे ,सरोज मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते .