प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , बारामती
शनिवार दिनांक 08 जानेवारी 2022
वासतिगृह विद्यालय कार्हाटी येथे नेहरु युवा केंद्र पुणे. युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार तसेच उत्स्फुर्ती फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुकास्तरीय विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये खो- खो, कब्बडी, रिले, धावणे तसेच गोळफेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रम उद्दघाटन प्रसंगी कार्हीचे सरपंच बबनराव जाधव, बारामती दूध संघाचे ह्या चेअरमण राजेंद्र रायकर चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त विनोद पवार,विद्या प्रतिष्ठान सुपे चे प्राचार्य डॉ.राहुल पाटील वसतिगृह विद्यालय प्राचार्य अनिल चव्हाण कृषी उद्योग मुल शिक्षण संस्थेचे संचालक दत्तात्रय वाबळे, बाबुर्डी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, नितिन नगरे , जिवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिपक वाबळे, दैनिक सकाळ चे पत्रकार विजय गोलांडे दै.प्रभात पत्रकार बाळासाहेब वाबळे सुपा फोटोग्राफर असोशियन चे गणेश खैरे क्रिडा शिक्षक भाऊसो पिसाळ अल्बाक्ष शेख उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आबासाहेब कोकरे यांनी केले तर प्रास्तविक नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी वैभव भापकर यांनी केले तसेच आभार प्रतिनिधी धिरज वायाळ यांनी मानले.
या स्पर्धेमध्ये बारामती तालुक्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला. व त्यामधील काही खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
तसेच बक्षिस वितरण कार्यक्रम सायंकाळी पार पडला यावेळी पानी फाउंडेशन बारामती समन्वयक पृथ्वीराज लाड , उज्वल आरोग्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, किर्तनकार संजय वाबळे, यादगार फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोजभाई बागवान, तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कदम मँडम उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे संत्रसंचलन सोमनाथ कदम यांनी केले तर आभार प्राचार्य अनिल चव्हाण यांनी मानले.
तसेच या कार्यक्रमासाठी रविंद्र पानसरे,मयुर खोमणे, दुर्वेश दुर्गे, शेखर खंडागळे, अमोल पोमणे अमोल पानसरे, अभिजित लडकत, गणेश इंगळे, सुरज जाधव, सागर पिसाळ, अजिंक्य यादव, स्वपनिल जगताप तसेच अनेकांचे सहकार्य लाभले.