प्रतिनिधी – आपल्या चुलत भावाला फोन करून बोलवून शेतामध्ये त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केला व त्याचे शरीर एका पोत्यात घालून शेतात पुरणाऱ्या आरोपीस भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक २१ /०८ /२०२१, रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास मिसींग इसम नामे सुजित संभाजी जगताप, वय.३२वर्ष, रा.शेटफळगळे, ता.इंदापुर, जि.पुणे हा त्याचे राहते घरातुन त्याचा चुलत भाऊ किशोर याचा फोन आला आहे. त्याने मला रानात बोलावले आहे. असे सांगुन तो घरातुन निघुन गेला तो परत घरीच आला नाही. म्हणुन त्याचे वडील संभाजी शिवाजी जगताप यांनी दिनांक. २३/०८/२०२१, रोजी भिगवण पोलीस स्टेशन येथे त्यांचा मुलगा मिसींग झाले बाबत तकार दिली. त्यावरून भिगवण पोलीस स्टेशन येथे मानव मिसींग रजीस्टर नंबर. २३/२०२१ प्रमाणे मिसींग दाखल करून तपास चालु केला. सदरचा मिसींगचा तपास करीत असताना सुरूवातीला पोलीसांना कोणत्याही प्रकाराचे धागेदोरे हाती लागत नव्हते. परंतु अतिशय सचोटीने व बारकाईने तांत्रिक विश्लेषन व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती काढुन इसम नामे किशोर बाळासो जगताप, वय.३०वर्ष, रा. शेटफळगढे, ता.इंदापुर, जि.पुणे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला. परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने नियोजन बध्दरित्या त्याचा चुलत भाऊ सुजित संभाजी जगताप यास त्याचे शेटफळगढे येथील शेतीमध्ये नेवुन खोऱ्याचे लाकडी दांडक्याने मारून त्याचा खुन करून पाठीमागे काहीएक पुरावा न ठेवता चुलत भाऊ सुजित संभाजी जगताप याचे प्रेत गोणीमध्ये भरून निर्जन ठिकाणी ऊसाचे शेतात खोल खड्डा खोदुन पुरून पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. आरोपी याने कबुली देताच तात्काळ भिगवण पोलीस स्टेशन चे दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक यांनी स्टाफसह व तहसिलदार इंदापुर यांचेसह घटनास्थळी भेट देवुन मयत बॉडी ऊसाचे शेतामध्ये पुरून ठेवलेली उकरून बाहेर काढुन तिची ओळख पटवुन झालेला गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन भिगवण पोलीस स्टेशन, भाग.५ गुन्हा.रजि.नंबर.०३/२०२२, भादवि.कलम.३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे किशोर बाळासो जगताप, वय.३०वर्ष, रा.शेटफळगढे, ता.इंदापुर, जि.पुणे यास सदर गुन्हयात अटक केली. यातील अटक आरोपी किशोर जगताप याने नक्की कोणत्या कारणावरून यातील त्याचा चुलत भाऊ सुजित जगताप याचा खुन केला आहे तसेच त्याचा आणखी कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथीदार आहे काय? याचा पोलीसांनी सखोल तपास सुरू केला असुन लवकरच या प्रकरणाचा तपासअंती छडा लावला जाईल. अटक आरोपीची दिनांक. ११/०१/२०२२,रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदरची कामगिरी डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टेचे पोसई विनायक दडस पाटील, रूपेश कदम, सुभाष रूपनवर, पोलीस अंमलदार नाना वीर, सचिन पवार, महेश माने, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे, आप्पा भांडवलकर, तसेच पोलीस मित्र अतुल माने, अनिल धवडे, सुहास पालकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *