टेक्निकलचे विद्यार्थी झाले लसवंत

प्रतिनिधी- बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज मध्ये आज मोठ्या उत्साहात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू झाले.पुणे जिल्ह्यात काल सोमवारपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीकरण साठी केंद्र सरकारने 3 जानेवारी पासून सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.मुलांच्या लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.नाझीरकर यांनी विद्यार्थी व पालक यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा व या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.उपस्थित डॉ.व आरोग्य कर्मचारी यांचे स्वागत विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सुदाम गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *