अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेसने राबविली “1 झाड, 1 विद्यार्थी” संकल्पना

प्रतिनिधी – पानसरे यांचे अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस मध्ये नववर्षानिमित्त 1 विद्यार्थी 1 झाड ही संकल्पना राबविण्यात आली. यावेळी बारामती नगर परिषद यांचे मार्फत अल्केमिस्ट च्या विद्यार्थ्यांना घन कचरा व्यवस्थापन याबद्दल प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासच्या संचालिका सौ ज्योत्स्ना पानसरे यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बारामती नगर परिषदेच्या उपमुख्याधीकारी पद्मश्री दाईंगडे उपस्थित होत्या. वरील पर्यावरणपूरक कार्यक्रमास बारामती नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी स्नेहल घाडगे, श्री तोडकर , मुल्ला सर, महिला व बालकल्याण विभाग सभापती सौ आशाताई माने, माजी नगरसेवक श्री जयसिंग तात्या पवार, मुख्याध्यापक श्री अहिवळे सर, प्रा. शिंदे सर, शेतकरी योद्धा चे संपादक श्री योगेश नालंदे , एक्सलेन्स सायन्स अकॅडमी चे संचालक गौरव गुंदेचा, सुप्रियाताई बर्गे इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज वाबळे सर यांनी केले तर आभार श्री प्रकाश पानसरे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांना देशी झाडांची रोपे वाटण्यात आली व त्याचे महत्व देखील सांगण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून वृक्ष लागवड करून संगोपन करणार असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *