माळेगाव (प्रतिनिधी- गणेश तावरे) मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित दादा युथ फौंडेशन ग्रुप अनेक कंपन्यात व एम आय ङी सी परिसरात 2000 मास्क वाटप केले. तसेच गोरगरिबांना कोरोना सारख्या महाभयंकर रोगात कॅल्शियम च्या गोळ्या वाटप केल्या. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अजित दादा युथ फौंडेशन ग्रुप चे कौतुक केले व असेच आपले समाज कार्य पुढे चालू राहू द्या अशी प्रेरणा दिली. विशेष म्हणजे यावेळी रक्तदान शिबिराचे खूपच कौतुक केले. दादांचे हे बोलणे ऐकून अजित दादा युथ फौंडेशन ग्रुप मधील सर्व मिञ परिवारांना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते व सर्व कार्यक्रम परत जोमात घेण्याची प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया ग्रुप च्या सदस्यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed