काळे परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी..

बारामती (दि:१) कै.अर्जुनराव बाजीराव काळे यांच्या स्मरणार्थ (दि:१) रोजी ऋतुराज काळे व नगरसेवक सत्यव्रत काळे यांच्या वतीने गरीब,गरजू नागरिकांना १ हजार ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. आई-बाबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऋतुराज काळे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सामाजिक स्वरूपात उपक्रम राबवून त्यांनी समाजकार्यात खारीचा वाटा उचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्गीय मानणारे. ऋतुराज काळे यांनी आपले वडील कै.अर्जुनराव काळे यांच्या स्मरणार्थ व आई सुभद्रा अर्जुनराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू नागरिकांना १ हजार ब्लँकेट वाटप केले आहेत. दरम्यान केलेल्या या कार्याचे कौतुक संपूर्ण बारामती परिसरात होत आहे.. ऋतुराज काळे यांनी पूर्वी वृक्षारोपण, शाळेतील मुलींना मोफत सायकल वाटप, अपंग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप, गरीब महिलांना साड्या वाटप, महिलांना पिटाची गिरणी वाटप, शिलाई मशीन वाटप केली आहे. आणि आज १ हजार ब्लॅंकेट चे वाटप केले आहे.

या प्रसंगी बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सोलापूर उद्योजक अरविंद चांडक, नगरसेवक अमर धुमाळ, नगरसेवक राजेंद्र बनकर, अँड सुधीर पाटसकर, पत्रकार तैनुर शेख, पत्रकार सुरज देवकाते, विजय खरात, फकरुद्दीन भोरी, अभिजीत चव्हाण, डॉ. गोकुळ काळे, सुनील काळे, संजोग काळे, डॉ. रणजित मोहिते, दत्तात्रय काळे, धैर्यशील काळे, अण्णा आटोळे, ऋषी देवकाते, सतीश ननवरे, जमीर शेख या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *