प्रतिनिधी – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत मौजे जराडवाडी येथे महीला शेतीशाळा घेण्यात आली. यामध्ये ज्वारी काढणीनंतरचे तंत्रज्ञान मध्ये प्रतवारी पॅकिंग , व विक्री व्यवस्था विषयी माहीती दिली . तसेच सध्या हरभरा पिकावर घाटेआळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता हरभरा पिकावरील एकात्मीक किड व्यवस्थापन विषयी माहीती दिली . शेतीशाळेमध्ये लघुअभ्यासामध्ये लसुन ,मिरची , तंबाखु पासुन तयार होणारे लमीत कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षीक करून 1 लीटर लमीत शेतीशाळेत तयार केले . हे लमीत ज्वारी ,मका वरील लष्करी अळी , हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी अत्यंत उपयोगी आहे .यामुळे रासायनीक किटकनाशकावर होणारा खर्चात बचत व त्याचे होणारे दुष्परीणाम कमी होण्यास मदत होईल. लमीत साठी लसुन, मिरची,तंबाखु वंदना जराड व रेखा जाधव यांनी बारीक करून रात्रभर भिजत घातले होते .व त्याचे प्रात्यक्षीक कृषि सहायक माधुरी पवार यांनी करून दाखवले. घरच्या घरी कमी खर्चात तयार होणारे किटकनाशकाचा वापर जास्तीत जास्त शेतकर्यानी करावा असे अवाहन कृषि सहायक यांनी शेतीशाळेतील महीलांना केले.