नाताळ सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे यांनी चर्च ऑफ ख्राईस्ट पुनर्स्थापित, बारामती या चर्च च्या कार्याची दखल घेत विशेष कौतुक केले.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,प्रेम,सहकार्य आणि बंधुभाव हीच प्रभू येशूची खरी शिकवण आहे त्याची आजच्या काळात नितांत आवश्यकता आहे.
या चर्च च्या वतीने नाताळनिमित्त अनेक विधायक उपक्रम गेली 115 वर्ष बारामती मध्ये राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये समाजातील गरजू व्यक्तींसाठी अन्नदानाचे पवित्र कार्य आयोजित केले होते तर लहान मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण व्हावी यासाठी त्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. नाताळ सण खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी चर्च च्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी डॉ. सौरभ मुथा यांची बारामती बँकेच्या संचालक पदी निवड झालेबद्दल चर्च च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमासाठी ख्रिस्ती युवक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी शहराध्यक्ष मा.इम्तियाज शिकीलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,नगरसेवक मा.अमर धुमाळ,मुस्लिम बँकेचे संचालक. मा.अल्ताफ सय्यद,त्याच प्रमाणे युवा नेतृत्व मा.आदित्य हिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. तर चर्च च्या वतीने अध्यक्ष सुनिल गोरे, सचिव वैभव वसंत पारधे, खजिनदार अनोश सांगळे,कार्याध्यक्ष नितीन पारकर, पास्टर अनोष खावडिया, पास्टर हेमलता गायकवाड, पास्टर सुनंदा गोरे व रावसाहेब चक्रनारायण व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समाजातील ख्रिस्ती बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 859