पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी…..
प्रतिनिधी- मागील काही दिवसापासून पुणे जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार प्रकरण, बँकावरती सशस्त्र दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने मा पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बीग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन झडती तसेच घरझडतीचे अभियान चालु होते. त्याचे पालन करत मा पोलीस निरीक्षक ढवाण यांनी आपल्या गुन्हेशोध पथकाला सोबत घेवून गावठी पिस्टल ची शोध मोहीम हाती घेतली. व हृददीमधील संशयित आरोपीचे वाहन-घर-झडती घेण्याचे काम चालू होते. दि. २५/१२/२०२१ रोजी दुपारी १५/०० वाचे सुमारास महेश ढवाण हे पोलीस स्टेशन ला हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदाराचा फोन आला की मौजे सूर्यनगरी येथे मोनिका लॉन्स येथे इसम नामे धर्मराज पोपट वाघमारे हा त्याचे लाल रंगाचे गाडीमध्ये दोन गावठी पिस्टल विकण्यासाठी घेवून येणार आहे. अशी माहती मिळाल्याने मा पोलीस निरीक्षक ढवाण यांनी त्याचे गुन्हे शोध पथकाला बोलावुन सदर बातमीचा आशय सांगुन सदर इसमावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हेशोध पथक रवाना होवुन मोनिका लॉन्स येथे सापळा रचून बसले होते. दरम्यान एक लाल रंगाची स्वीफ़्ट गाडी न एमएच ४२ एएक्स ७०६० ही जळोची या बाजुने येवून मोनिका लॉन्स समोर उभी राहताच. गुन्हेशोध पथकातील स्टाफ ने स्वीफट मध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव धर्मराज पोपट वाघमारे वय ३३ वर्षे रा शेळगाव ता इंदापुर जि असे सांगितले. त्याची अंगझडती व गाडीची झडती घेतली असता खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे. १) ५०,०००/- रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल, सिल्वर रंगाचे बाजुस लाल रंगाची पटटी असलेले लोखडी धातुचे मॅगझीन सह ७.६२ एमएम असे लिहलेले जिवत काडतुसे कि अ २)३००/ ३) ४००००० /- रुपये किमतीची लाला रगाची स्वीफ्ट कार तिचा नं एमएच ४२ एएक्स ७०६० असा लिहलेला जुवा कि अ ४,५०,३०० रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल ३. जिवंत काडतुसे तसेच गुन्हयात वापरलेली कार जात करून आरोपी याचे वर भारतीय शस्त्र अधिनियम ५(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गन्हयाचा अधिक तपास सपोनि विधाते हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, सो अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे, पो.ना रणजीत मुळीक, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, चा पो ना सदाशीव बंडगर यांनी केली आहे.