प्रतिनिधी – तक्रारदार रॉबीन वसंतराव गायकवाड यांनी त्यांच्या मुलासाठी दोन वर्षापूर्वी बजाज कंपनीची ड्यूक केटीएम 250 सीसी इंजिन असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच 42 ए डब्ल्यू 43 34 दीड लाखाची मोटर सायकल विकत घेतली. सदर मोटरसायकल त्यांनी रात्रीच्या वेळेस कृष्णा गंगा अपार्टमेंट टीसी कॉलेज जवळ येथे पार्क करून ठेवली असता दिनांक 17 डिसेंबर च्या रात्री ती गाडी तिला संपूर्ण आटोमॅटिक लॉक असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून 21 डिसेंबर रोजी फिर्याद दिली. सदर गाडी महागडी असल्याने व सहजासहजी आरोपीला चोरून नेता येणे शक्य नसल्याने तात्काळ तपास पथकास सदर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसरात चौकशी करण्याचे आदेश दिले असता ज्या दिवशी तपास पथकाने त्या ठिकाणी भेट दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री सदरची मोटरसायकल परत फिर्यादी यांच्या दारात रात्री आणून ठेवण्यात आली. सदर बाबत पोलीस खरंच मोटारसायकल चोरी गेली होती का दुसरा काही प्रकार आहे याबाबत चौकशी करत आहेत परंतु फिर्यादी हे मोटरसायकल मिळाल्यामुळे आनंदी असून त्यांनी पोलीस ठाण्याचे अभिनंदन केले आहे. सदरची मोटरसायकलचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान दुधे यांनी केलेला आहे. मोटरसायकल मिळाली असली तरीसुद्धा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed