बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके (D.S.P) यांना २०२१ चा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्री. दत्तात्रय फाळके हे ब्रम्हचैतन्य श्रीनिवास क्रिडा, सामाजिक संस्था तडवळे या मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख तसेच भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य खटाव तालुका अध्यक्ष, रयत सामाजिक प्रतिष्ठान सातारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख , दक्ष पत्रकार संघ खटाव तालुका संघटक, महाराष्ट्र पत्रकार संघ खटाव तालुका सचिव, माहिती अधिकार, पोलीस मित्र , पत्रकार संरक्षण सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख , अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष , RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन सातारा जिल्हा संघटक या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी या संघटनाच्या, संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या पुरस्कार वितरण सोहळयासाठी या कार्यक्रमाचे आयोजक मा.सौ.प्रतिभाताई पाटील (संस्थापिका-अध्यक्ष सुर्योदय प्रतिष्ठान) , या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. उद्धव कानडे (जेष्ठकवी , महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे) , मा.श्री. बाळासाहेब मोहरे (सुभेदार मेजर अँण्ड कॅप्टन २१ पंँरा स्पेशल फोर्स) , मा.श्री.गुलाबराव पाटील (अध्यक्ष खान्देश मराठा मंडळ) , मा. श्री. राजेंद्र सुरवसे (स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट अक्कलकोट ) , मा.श्री. नवनाथ येवले (संस्थापक येवले अमृततुल्य) , सौ.वसुंधराताई उबाळे (सरपंच वाघोली , मा.सभापती पंचायत समिती हवेली ), मा.श्री. रियाज सय्यद (सामाजिक कार्यकर्ते ठाणे ) , वीरपत्नी श्रीमती मिनाक्षी भिसे ( कारगिल युद्धात शहीद झालेल्या २१ पॅराशूट स्पेशल फोरसिसे नायक शिरीषकुमार भिसे शार्प शूटर यांच्या पत्नी) , मा.सौ.स्मिता माने ( अध्यक्ष राष्ट्रीय संस्था पश्चिम महाराष्ट्र) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *