प्रतिनिधी – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या विधायक समाजोपयोगी कार्यक्रमांनी वाढदिवस कार्यकर्त्यांनी असेल किंवा हितचिंतकांनी असेल तो वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला. अशाच पद्धतीने बारामतीमधील नगरसेवकांनी मिळून अनाथ, बेघर असणाऱ्या फुटपाथवर झोपणार्या लोकांना थंडीमध्ये उपयुक्त येतील असे रजई देऊन साजरा केला.
याबाबत सविस्तर बातमी अशी की.. माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 वाढदिवसाचे औचित्य साधून, मा ना अजित दादा पवार यांच्या प्रेरणेने, बारामती शहर व परिसरामधील अनाथ गरजू नागरिक की जे एस टी स्टँड , फुटपाथ, रेल्वे स्टेशन, मंदिर या ठिकाणी उघड्यावर झोपलेले आहेत अशांना मध्यरात्री 12 वाजता बारामतीकरांच्या वतीने अंगावर रजई टाकून त्यांना मायेची उब उपलब्ध करून देऊन वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे, नगरसेवक बिरजू मांढरे, अभिजित चव्हाण व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *