प्रतिनिधी – बारामती शहरांमध्ये मेडिकलचे शटर उचकून एक इसम चोरी करत असताना नागरिकांनी त्यास पकडून पोलीस स्टेशनला कळविले असता बारामती शहर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले असता सदर आरोपी हा भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना खाली पडून जखमी झाला होता. त्यास पोलिसांनी महिला हॉस्पिटल बारामती येथे उपचारासाठी दाखल केले व जखमीस अधिक चौकशी केली असता या इसमाने पाटील मेडिकल मोतीबाग बारामती येथे चोरी केल्याची कबुली दिली.
या चोरट्याचे नाव आकाश विठ्ठल पाटोळे असून सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे 19 गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश विठ्ठल पाटोळे यांचेकडून रोख 2,100 /- रुपये तसेच पुणे शहरातून चोरी केलेली एक पांढरे रंगाची स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अरुण रासकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसनिरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहा.फौजदार अरुण रासकर, संजय जगदाळे, पोना. कोळेकर, पोकॉ.तुषार चव्हाण, बंडू कोठे, मनोज पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *