प्रतिनिधी – मुस्लिम समाजाच्या संविधानिक हक्क अधिकारांसाठी, ऍड प्रकाश आंबेडकर तसेच प्रभारी अध्यक्षा रेखा ताई ठाकूर यांच्या आदेशानुसार एकदिवसीय धरणे आंदोलन बारामती येथे करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या ५% आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे तसेच इतर सर्व मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात. यासाठी बारामती तालुका व शहरच्या वतीने बारामती तहसील कार्यालय या ठिकाणी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले, दरम्यान मुस्लिम समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रांतधिकारी कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
यामध्ये पक्षाने जाहीर केलेल्या सहा मागण्या तसेच मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डच्या जमीनीवरती अनधिकृतरित्या कब्जा करण्यात आलेला आहे, हा कब्जा उठून या जमिनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा. अशा अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास भाऊ निकाळजे, तालुकाध्यक्ष रोहित पिल्ले, शहराचे अक्षय शेलार यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले, यावेळी तालुका महासचिव विक्रम थोरात, मयूर कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रोहित भोसले, अण्णा घोडके, अखिल बागवान, अफसर बागवान, ऍड तुषार ओहळ, मोहन कांबळे, विनय दामोदरे, प्रशांत सरतापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *