माळेगाव (प्रतिनिधी – गणेश तावरे )विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पक्षाचा जाहीरनाम्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार असा शब्द दिला होता. ST कामगारांच्या अधिवेशनात सुद्धा हाच शब्द दिला होता. परंतु महाविकास आघाडी च्या रूपाने सत्तेवर येऊन सुद्धा मा. पवार साहेबांनी शब्द पाळला नाही. 36 कर्मचाऱ्यांनी आंदोलनात आत्महत्या केल्या. याला जबाबदार कोण…? राज्यसरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तात्काळ राज्य सरकार मध्ये एसटी महामंडळाच्या कामगारांचा विलीनीकरण करावे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. यासाठी दोन दिवसात मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांना सुद्धा संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ भेटणार आहे असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्यात जर खाजगी ड्रायव्हरला 35 ते 40 हजार रुपये पगार मिळू शकतो तर मग एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना इतका कमी पगार का…? त्यांनी तुटपुंज्या पगारात स्वतःचा संसार कसा चालवायचा…? सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू असल्यामुळे राज्य सरकारने सूडबुद्धीने बऱ्याच कामगारांचं निलंबन केले आहे, ते तात्काळ थांबून सर्व कामगारांना सेवेत पूर्ववत करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाइलने फलटण सातारा जिल्हा व महाराष्ट्रात आंदोलनाचा उद्रेक होईल आणि याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची असेल. सरकारने वेळकाढू पणा करू नये.

फलटण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी आज संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला व सोबत राहण्याचे आश्वासन दिले यांच्यानंतर संपूर्ण फलटण सातारा व महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आंदोलनात उतरणार आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे महात्मा फुले युवक संघटना अध्यक्ष सचिन अभंग पत्रकार सुबोध शिर्के संग्राम शेळके अजित शिंदे संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष रणजित जांभुळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *