माळेगाव : (प्रतिनिधी गणेश तावरे ) रविवार दि.२४ रोजी बारामती येथे चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी चे एक दिवसीय शिबीर संपन्न झाले, याचे आयोजन अनुराग राजेंद्र देशमुख अध्यक्ष चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी यांनी केले होते.या शिबिरात एकूण एक वीस विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये योगा सेशन्स , फिटनेस ट्रेनिंग , स्पोर्ट्स आणी ट्रॅडिशनल कराटेचे सखोल प्रशिक्षण व रोगप्रतिकारक क्षमतेत कशी वाढ करावी हे सांगितले गेले , व त्या बरोबर विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. अनुराग यांनी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले की या शिबिरास प्रतिसाद दिला व त्यांनी मुलांना व पालकांना संबोधित केले की या धावपळीच्या काळात मुलांना व्यायामाची खूप गरज आहे व आता चाललेल्या परिस्थितीमध्ये मुलांना रोगप्रतिकारशक्ती मध्ये वाढ करण्याची गरज आहे त्यासाठी मुलांनी कोणत्याही खेळांमध्ये भाग घेणे गरजेचे आहे. या या शिबिरासाठी समर्थ वणवे व शेखर गोसावी याचे मार्गदर्शन मुलांना लाभले याबद्दल यांचे आभार अनुराग यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed