प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर 2021
यादगार सोशल फाऊंडेशन व इन्लॅक बुधरानी हाॅस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन तसेच यादगार सोशल फाऊंडेशन च्या वतीने प्रभाग क्रमांक 16 मधील जेष्ठ नागरिकांना डोळे तपासून मोफत चष्मे वाटप कार्यक्रम मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. खरं तर यादगार सोशल फाउंडेशन आणि समाजोपयोगी कामं हे जुनंच समीकरण. परंतु ‘कोरोना’ सारख्या जागतिक रोगराईचा सामना करून त्या धक्क्यातून जग सावरत असतानाच या लढाईत मौल्यवान योगदान देणाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून फाऊंडेशनकडून पुरस्कृत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यासाठी पवार साहेबांसारख्या दिग्गज आधारवडाची मार्गदर्शक व आशीर्वादासाठीची उपस्थिती, असा दुर्मीळ ‘ दुग्धशर्करा योग’ जुळून आल्याने कार्यकर्ते अजूनच उत्साहाने कामाला लागले.
याप्रसंगी बोलताना पवार यांनी यादगार सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी.फिरोजभाई अजिजभाई बागवान व इन्लॅक बुधरानी हाॅस्पिटल यांनी आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिराचे कौतुक करताना कोरोना काळात जगातील सर्व देशात या महामारीत मुत्युदर खुप होता पंरतू आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व नर्स तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था व प्रत्येकानेच आपल्या जिवाची पर्वा न करता सातत्याने कोरोनाकाळात कार्यरत राहिल्यामुळे आपल्या देशात मुत्युदर कमी राहिला व आपण आज कोरोना शी लढण्यात यशस्वी होतोय आज प्रत्येकानेच सामाजिक कार्यात सढळहाताने पुढे आले पाहिजे आज मला आनंद आहे की यादगार सोशल फाऊंडेशन,सामाजिक कार्यात नेहमीच कटिबद्ध व अग्रेसर आहे व यापुढेही राहिल यासाठी शुभेच्छा देतो.
याप्रसंगी सौ.पौर्णिमा तावरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.श्री.प्रदीप गारटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या,
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष श्री.सदाशिव सातव, सौ.भारती मुथा, गटनेते श्री.सचिन सातव, नगरसेविका सौ.सुहासिनी सातव, सौ.कमलताई कोकरे, मा.नगरसेवक,श्री. निलेश इंगुले,श्री. सिध्दनाथ भोकरे, श्री.अनिल कदम, उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका सौ.बेबीमरियम अजिजभाई बागवान, मा.नगरसेवक अमजदभाई अजिजभाई बागवान व बाळासाहेब पाटील याचे मोलाचे सहकार्य व मा.नगरसेवक हाजी.अजिजभाई महेबूबभाई बागवान यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रम आयोजनात यादगार सोशल फाऊंडेशन चे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते चे मोलाचे सहकार्य लाभले.
कोरोनाकाळात बारामती शहर व परिसरातील सामाजिक क्षेत्रातील संस्था तसेच आरोग्य कर्मचारीवर्ग तसेच डाॅक्टर, पोलीस प्रशासन यांनी केलेल्या कार्यचा गौरव कोरानायोध्दा म्हणून आरोग्य विभाग (बा.न.प), सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, ज.मेहबुबभाई बागवान व त्यांचे सहकारी, अखिल तादुंळवाडीवेस तरूण मंडळ, जय जवान तरूण मंडळ, व्हिक्टरी सोशल क्लब यांचा सन्मान करण्यात आला.