प्रतिनिधी- दिनांक २० ऑक्टोबर, मंगळवार रोजी बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला यांच्या वतीने शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवन येथे केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न झाला व त्यानंतर माळावरची देवी येथे गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन बारामती महिला शहरअध्यक्षा सौ.अनिता गायकवाड यांनी केले होते. या वेळी अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
सौ सुनेत्रा पवार या नेहमीच सामाजिक कार्यक्रमातुन गोर गरिबांची व समाजातील इतर घटकांची सेवा करत असतात. महिलांना रोजगार निर्मिती असेल किंवा पर्यावरण जनजागृती असेल या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळेच आम्ही त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्याचे ठरवले व गरजू महिलांना साडी वाटप केले असल्याचे मत अनिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *