प्रतिनिधी- पुणे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे ईद-ए-मिलादुन्नबी चे औचित्य साधून बारामती येथील ऑल इंडिया जमियतुल कुरेश व जामा मस्जिद बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने व मा.सुभान भाई कुरेशी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ऑल इंडिया जमियतुल कुरेश यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतला व रक्तदान केले.
मा. किरण गुजर ज्येष्ठ नगरसेवक , बारामती नगरपरिषद यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नामदेवराव शिंदे,पीआय ,बारामती शहर पोलीस स्टेशन हे होते. तसेच मा.सदाशिव सातव माजी नगराध्यक्ष ,बारामती नगरपरिषद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी मौलाना जाकिर हुसेन रिजवी, मा.अल्ताफभाई सय्यद संचालक मुस्लिम बँक मा.अमजदभाई बागवान माजी नगरसेवक, बारामती नगरपरिषद मा. इम्तियाजभाई शिकीलकर ,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,बारामती शहर मा.बाळासाहेब चव्हाण पाटील सामाजिक कार्यकर्ते, तैनुरभाई शेख साप्ताहिक वतन की लकीर, ऍड अविनाश गायकवाड उपाध्यक्ष ,बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस ऍड करीमभाई बागवान, परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, हाजी शब्बिरभाई कुरेशी, हाजी समदभाई कुरेशी, बाबाभाई कुरेशी, हाजी शाकीरभाई कुरेशी, वसीम भाई कुरेशी, नदीम भाई कुरेशी, मुजाहिद शेख व इतर मान्यवर उपस्थित होते., आलेल्या पाहुण्यांचे स्वागत वसीम भाई कुरेशी व गुफरानभाई कुरेशी यांनी केले . यावेळी हाजी शब्बिर भाई कुरेशी यांनी प्रस्तावना केली व किरण गुजर आणि नामदेव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . आभार सुभान बाबाभाई कुरेशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *