प्रतिनिधी- आरक्षणाच्या जनजागृतीची वारी तुमच्यादारी महाराष्ट्र दौरा अंतर्गत रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत सामावेश व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय बेडर रामोशी सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष कै डॉक्टर भीमराव गस्ती यांचे सुपुत्र ज्येष्ठ विधिज्ञ Adv सुरेश भिमराव गस्ती यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सांगता बारामती येथे प्राध्यापक ऋषिकेश माकर यांच्या निवासस्थानि समाजबांधवांच्या उपस्थितीत झाली.
ज्याप्रमाणे कै.भीमराव गस्ती यांनी कर्नाटक ,आंध्र प्रदेश तामिळनाडू व राजस्थान या राज्यात रामोशी समाजाचा समावेश न्यायालयीन मार्गाने योग्य पुराव्यांच्या आधारे अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही रस्त्यावर न उतरता कोणताही जमाव न जमवता केवळ योग्य न्यायालयीन मार्गाचा अवलंब करूनच अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवता येऊ शकेल असे Adv. सुरेश गस्ती विधिज्ञ उच्च न्यायालय यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील रामोशी समाजाची लोकसंख्या व उपलब्ध असणारे आरक्षणाची टक्केवारी चे प्रमाण व्यस्त असल्याने युवकांना स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीत कमी संधी मिळते. त्याचा परिणाम समाजातील सामाजिक आर्थिक स्तर खालवण्यात होतो असे निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक ऋषिकेश माकर यांनी नोंदवले.
यावेळी गोविंद देवकाते, घनशाम केळकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक आनंदराव जाधव, आभार प्राचार्य सिताराम माकर , व सूत्रसंचालन संतोष जगताप यांनी केले. कार्यक्रमास विजय जाधव, प्रल्हाद मदने, राजेश मदने, गणेश पाटोळे , सचिन मदने , इराप्पा नाईक , विजय पाटील, नवनाथ मदने, प्रा. सातारले ,देव पाटोळे , दादा चव्हाण, सुनील जाधव हे समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *