प्रतिनिधी- वयोवृद्ध लोकांची सेवा हीच समाज सेवा समजून संभाजी होळकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बारामती यांनी बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील बोरावके वृद्धाश्रम येथे सौ सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या जीवनातील एक हजार पौर्णिमा आणि 80 वी कोजागिरी पौर्णिमा निमित्त शिवराज जाचक यांनी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध माता-भगिनींना मिष्ठान्न स्नेहभोजन व मसालेदार दूध असा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ माता-भगिनी नागरिक यांच्या वतीने केक कापण्यात आला. यावेळी सचिन सातव गटनेते बारामती नगरपालिका, संदीप जगताप चेअरमन तालुका दुधसंघ, सुनील देवकाते, निखिल जाधव, हरिभाऊ काळे, मुरलीधर घोळवे अध्यक्ष किशोर मेहता सेक्रेटरी फकृद्दिन कायमखानी खजिनदार बबनराव शेळके, अमित बोरावके, उद्देश कांबळे, सोहेल आत्तार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संभाजीराव होळकर यावेळी म्हणाले की पवार साहेबांनी आज पर्यंत सामाजिक भावनेतून शेतकरी कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडवत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानला त्यामुळे उपेक्षित वंचित लोकांचे प्रश्न आजपर्यंत सोडवले त्यामुळेच त्यांचं आरोग्य उत्तम आहे आणि आज शरद पौर्णिमा त्यांच्यासाठी दुग्ध शर्करा योग रूपाने आली आहे. बारामती टेक्सटाईल च्या मार्गदर्शक आणि बारामती मध्ये समाजसेवेचा ज्यांनी डोंगर उभा केला अशा सुनेत्रा पवार यांचा आज वाढदिवस… बारामती मध्ये वृक्षरोपण असेल, विविध स्पर्धा असतील, आरोग्य शिबिर असतील, कित्येक उपक्रम आहेत की त्या उपक्रमामुळे लोकांना रोजगार मिळत आहे. यामागची अदृश्य शक्ती वहिनी साहेब आहेत असं मत व्यक्त केले. सेक्रेटरी किशोर मेहता तसेच संभाजी होळकर यांनी आपले मत मांडले व शिवराज जाचक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.