प्रतिनिधी- गेल्या काही महिन्यांपासून बारामती तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये घरफोडी व दरोड्याचे प्रमाण वाढले होते. याच अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशनने कडक पावले उचलत मोहीम राबवली. याच दरम्यान सांगवी येथील वरून तावरे यांच्या विजय इंडस्ट्रीज नावाच्या पत्रा बनवण्याचे कंपनीमध्ये काही चोरट्यांनी घरफोडी केली. त्याचाच आधार घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असता सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील महेश भीमा शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली. त्या आधारे त्याला ताब्यात घेऊन विचार विचारपूस केल्याने त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या या आरोपीवर अकरा घरफोडीचे व एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. माळेगाव सांगवी परिसरातील घरफोडी करणारा गुन्हेगार ताब्यात घेतल्याने या भागातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे व या कामगिरीबाबत पोलिसांचेही कौतुक केले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग श्री गणेश इंगळे, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री राहुल घुगे, पोहवा रावसाहेब गायकवाड, तपास शशिकांत वाघ, पोना राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पोशि प्रशांत राउत, दिपक दराडे, पथकाचे पोशि विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, राहूल पांढरे यांनी केली आहे.