प्रतिनिधी – समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा व भोंडला दांडिया कार्यक्रम काल सायंकाळी बारामती मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने घेण्यात आला. यावेळी महीला तालुकाध्यक्ष सौ.वनिता बनकर, माजी. उपसभापती शारदा खराडे, ॲड. सुप्रिया बर्गे, भाग्यश्री धायगुडे, आरती शेङगे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विद्या कांबळे माॅडेल/ॲक्टरेस, रूपाली शिंदे महाराष्ट्र क्वीन या उपस्थित होत्या. खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष पुजा बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार “नवदुर्गा-सन्मान जागर स्ञीशक्तीचा” हा महीलांसाठी उपक्रम राबविण्यात आला. विविध क्षेञात कार्यरत असणाऱ्या स्ञीशक्तीचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. भोडंला-दांडिया अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन रोहीणी खरसे यांनी केले होते. युवती व महीला यांच्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू व हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहु यासाठी सहेली उदयोजिका ग्रुपची स्थापना यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अमृता भोईटे पोलीस, अनिता ठवरे उद्योजिका, सुप्रिया बर्गे वकील, प्रतिमा कुभांर कोरोणा योध्दा, रेश्मा गडकर कवयञी, निर्मला कोरी शिक्षिका, सुनिता पिसे वेशभुषा, आरती निरोखे रायफल शुटर गोल्ड मेडेलीट्स, विद्या कांबळे माॅडेल/ॲक्टरेस यांना सन्मानित करण्यात आले.