पुणे,दि.11:- सर्वसाधारण योजना व अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व इतर पात्र विभागांनी विहित नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग,अदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी रुपये 7 लाख रूपये इतके कमाल अनुदान देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, द्वारा सर्व्हे क्रमांक 191, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा, पुणे या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन श्री बागुल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *