बारामती दि. 10
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धडाडीचे नेतृत्व आणि आणि त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे बारामतीचा चौफेर विकास होत आहे. या विकासाची चर्चा महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर होताना आपण पाहतो.
एसटी स्टॅन्ड, पोलीस वसाहत, वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, पोलिस मुख्यालय या आणि अशा अनेक प्रकारची विकास कामे बारामती मध्ये सुरू आहेत याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना आपण पाहतो.
बारामती कॕनॉलचे दादानीं केलेले सुशोभीकरण पाहून बारामतीकर भारावून जात आहेत. त्याच कॅनल च्या बाजूला झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर सुजित जाधव मित्र परिवाराच्या वतीने आज रविवार दि.१० रोजी नगरपालिकेस महोगनी जातीचे 101 वृक्ष देण्यात आले. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या मोहिमेस वृक्षारोपण करुन सुरुवात करण्यात आली.
अजितदादांनी सुजित जाधव मिञपरिवाराच्या कार्याचे कैतुक केले.
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक अतुल बालगुडे, सुजित जाधव, विशाल जाधव, संदीप पाटील, नानासाहेब साळवे, गणेश भोसले, अभिजीत शेळके व अविनाश सूर्यवंशी उपस्थित होते.