प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग बारामती यांचे मार्फत शेतकर्याना मका पिकावरील रोग व किडी यांची ओळख व्हावी तसेच रासायनिक व सेंद्रीय खते यांचा योग्य वापर याविषयी मार्गदर्शन करणेसाठी शेतीशाळा एकून दहा वर्गाचे आयोजन करण्यात आले.
सदरील शेतीशाळा आयोजन करणेसाठी सरपंच विलास चांदगुडे, उपसरपंच सुखदेव नाळे, पोलिस पाटील हनुमंत नाळे, कृषीमित्र अनिल नवले व पांडुरंग नाळे त्याचप्रमाणे गावातील सर्व शेतकरी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
कृषी विभागामार्फत श्री वैभव तांबे उपविभागीय कृषी अधिकारी, श्रीमती सुप्रिया बांदल तालुका कृषी अधिकारी ,श्री यमगर साहेब मंडळ कृषी अधिकारी व शिवाजी पवार कृषी पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषि सहाय्यक श्री संतोष पिसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.