समाज प्रबोधनासाठी “साहित्य” महत्त्वाचे – सौ.भारती सावंत

महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांतुन आपल्या वाचकांना निरनिराळ्या प्रकारचे बोधपर लेख, कविता लिहून सुप्रसिद्ध झालेल्या लेखिका, कवयित्री यांनी गेल्या दीड वर्षांतील कोरोनाकाळाचा सदुपयोग करून आपली वाचनाची आवड जपत साहित्य संपदा वाढविली आणि आता ती वाचकांच्या संग्रहात ठेवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. जगाकडे उघड्या डोळ्यांनी चौफेरपणे पहात समाज, परिसर, वातावरण, निसर्गसौंदर्य, नातीगोती या सर्वांचा सन्मान करत त्यांनी कधी परखडपणे तर कधी हळव्या मनाने, कधी प्रेमतरंगांमधून तर कधी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने त्यांनी आपले लेखसंग्रह, कथासंग्रह, कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. वाचकांनी ते आपल्या संग्रही ठेवून आपल्या घरातील छोट्याशा ग्रंथालयाची शोभा वाढवावी असे लेखिका आणि कवयित्री सौ.भारती सावंत यांनी आवाहन केले आहे. एखादी सुंदर साहित्यिक कलाकृती आपल्या निखळ वाचनाची ग्वाही देते. मनाला आनंद मिळवून देते. ती अनुभूती मिळवून देण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे.

सौ.भारती सावंत
संपर्क- 9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *