पुणे दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून राज्यातील शेतकऱ्यांना डिजीटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा मोफत घरपोच वाटप मोहिम सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ५६० गावात २४ हजार २२० शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप तर २ हजार ९०५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोविड १९ बाबतच्या नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारीत नमुन्यातील डिजीटल स्वाक्षरीत सातबारा मोफत वाटपाचा शुभारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री श्री. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुखांच्या उपस्थितीत झाला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या मोहिमेला गती देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात ५६० गावात २४ हजार २२० शेतक यांना मोफत सातबारा वाटप करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत सातबारा वाटप करण्याचे नियोजन आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी व रेशन कार्ड मधील नावे समाविष्ट करणे तसेच वगळणे, नवीन रेशनकार्डच्या २ हजार ९०५ लाभार्थ्यांनादेखील त्यांच्या अर्जाचा तसेच विनंतीच्या अनुषंगाने लाभ देण्यात आला.
सातबारा वाटप झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या
हवेली तालुक्यातील 36 गावांत 1 हजार 1, पुणे शहर एका गावात 25, पिंपरी चिंचवड 12 गावात 475, शिरुर 36 गावात 1 हजार 546, आंबेगाव 29 गावात 1 हजार 652, जुन्नर 54 गावात 1 हजार 15, बारामती 49 गावात 3 हजार 517, इंदापूर 47 गावात 2 हजार 433, मावळ 43 गावात 3 हजार 712, मुळशी 11 गावात 956, भोर 45 गावात 1 हजार 480, वेल्हा 19 गावात 589, दौंड 81 गावात 2 हजार 130, पुरंदर 27 गावात 905, खेड 70 गावात 2 हजार 784