माळेगाव (प्रतिनिधी- गणेश तावरे) काल दिनांक 3 सप्टेंबर रोजी नारोळी गावातील सचिन दत्तात्रय ढमे व गजानन शिवाजी भंडलकर यांनी देशासाठी 17 वर्ष अहोरात्र सेवा करून त्यांनी देशसेवेचे कर्तव्य पूर्ण केले. त्यांचे नारोळीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टंसिंग पालन ठेवून त्यांची भव्य अशी गावात मिरवणूक काढली. तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नारोळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच महिलावर्ग व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जवानांनी आता देशाची सेवा केली आता गावाची सेवा करून व गावाचं नाव मोठं करु असे सांगितले व समस्त ग्रामस्थ त्यानी आभार मानले.