नानासाहेब साळवे
बारामती दि, 3 – संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग चे काम प्रगतीपथावर आहे, त्यामध्ये आज गोजूबावी या ठिकाणी पालखी महामार्गाचे काम सुरू करण्यात आले होते.
या अगोदर शेतकऱ्यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार रुपये प्रमाणे पैसे आदा करण्यात येतील आशा नोटीस देण्यात आल्या होत्या. परंतु आज परत पुन्हा एकदा नव्याने नोटीस शेतकऱ्यांना मिळाली असून यामध्ये बेकायदेशीरपणे निवडा दुरुस्त करून सदरची नोटीस पाठवली आहे
परंतु महामार्ग कायद्यानुसार सहा महिन्यानंतर निवडा दुरुस्ती करता येत नाही असे असताना दोन वर्षानंतर निवाडा दुरुस्त करून गावातील शेतकऱ्यांना आज रोजीच्या बाजार भावापेक्षा कमी किंमतीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले व सदर शेतकऱ्यांनी महामार्गाचे चालू झालेले काम बंद पडले
यामध्ये शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे प्रमुख मागण्या केल्या
आहेत
१) बेकायदेशीरपणे दुरुस्त केलेला निवाडा रद्द करा
२) दोन पूर्वीच्या निवाड्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला द्या
३) शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाल्याखेरीज काम चालू करू नये
या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत
या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना 29 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी अर्ज दिला असतानाही दडपशाही पद्धतीने काम चालू केले असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली. जोपर्यंत पुर्वीच्या नोटीसीप्रमाणे भाव मिळत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही या भुमिकेवर शेतकरी ठाम आहेत.