नानासाहेब साळवे
प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय बारामती येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व लाल बहादूरशास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा करण्यात येतो. महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आला. तसेच लाल बहादूरशास्त्री यांच्या जय जवान जय किसान या विचारांचे महत्व अधोरेखित करण्यात आले, व भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री यांचे महत्व स्पष्ट करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री झाकीर शेख, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री रमेश जाधव, उपशिक्षक श्री अविनाश कोकरे, श्री हनुमान राठोड, श्री सुनील चांदगुडे, श्री किरण हिंगसे, श्री संपत भिसे, श्री मोहिते, श्री तांबडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री प्रदीप पळसे यांनी केले होते.