प्रतिनिधी – “साहित्य हे मनाच्या तळाशी असलेले प्रतिभेचं गुपित आहे.नव्या विचारांची थापणूक करुन जीवन समृद्ध करण्याचा राजमार्ग आहे. नवोदित साहित्यिक घडविण्यात साहित्य कट्ट्याची नितांत गरज आहे.भीमथडीच्या तट्टावर साहित्यिक मांदियाळीतून ही गरज पूर्ण होत आहे.” असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात बारामती साहित्य कट्टा आयोजन केले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.कोकरे बोलत होते.
“साहित्यिक जडणघडण ही आपल्या प्रतिभेच्या जोरावर घडत असते.चौफेर वाचन , सुक्ष्म निरीक्षण , शब्दसंपत्ती साठा, लेखन तंत्र याने साहित्यिक तयार होत असतात.साहित्य हे प्रांत जात धर्म यापलिकडे जाऊन कार्य करित असते.बारामती साहित्य कट्टयाने राजकीय ओळखी बरोबरच साहित्य चळवळीला गती दिली आहे. “
कार्यक्रमास वाचक, रसिक , वक्ते , लेखक , कवी यासह समाज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन शशांक मोहिते यांनी केले. आयोजन विपुल पाटील, सचिन वाघ, संजय चौधर, दिनेश आदलिंगे, रवींद्र टकले यांनी केले.