प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर २ येथील पूजा भाऊसाहेब पानसरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल व वन विभागातील सहाय्यक वनसंरक्षण गट तसेच वनक्षेत्रपाल गट ब या संवर्गातील एकूण शंभर पदावरील भरती करिता दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल २९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीमती पूजा भाऊसाहेब पानसरे यांची महिला मधून प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. त्यांनी मिळवलेल्या उत्तम यशाबद्दल डाळज नं.२ या ठिकाणी समस्त वंजारी समाज समन्वय समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित डाळज नं.२ चे समाज बांधव तसेच या वेळी उपस्थित श्री. रुपेश गमरे, श्री. दिपक खाडे, श्री. प्रदिप सोनने, श्री. अभिजित पानसरे, श्री. माऊली सोनने, श्री. सत्यजित पानसरे, आणि वंजारी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष, व ग्रामपंचायत निमसाखर सदस्य पै.श्री. शेखर भाऊ पानसरे, युवा समाजसेवक डाळज नं.२ दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब पानसरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *