प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , शुक्रवार दिनांक 01 ऑक्टोबर 2021
देऊळगाव रसाळ या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौ. तृ. रब्बी ज्वारी चे बियाणे वाटपाचा कार्यक्रम पार पडला . त्यावेळी मार्गदर्शनासाठी श्री. गणेश जाधव सहाय्यक अधिकारी आत्मा , म. कृ. अ. यमगर साहेब, कृ. प. जाधव , कृ. स. गुंड उपस्थित होते .
यावेळी ज्वारी पिक पेरणीपासून ते काढणीपर्यत येणाऱ्या अडचणी वर काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर मार्गदर्शन करण्यात आले. ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले . ज्वारीवर 60 दिवसानंतर मवा पडतो आणी नंतर मव्यापासून चिकटा, हा ज्वारी पिकावर जास्त प्रमाणात दिसुन येतो. त्यासाठी निमार्क ( निंबोळी आर्क ) याची फवारणी करावी असे सांगण्यात आले. तसेच ज्वारी बीज प्रक्रिया व उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले .
त्यावेळी उपस्थित श्री. तानाजी रसाळ , लक्ष्मण वाबळे , विजय भिसे , अमोल रसाळ , संजय रावडे , संतोष रसाळ , जैनुद्दीन इनामदार , तुषार वाबळे , पंढरीनाथ जगताप , अशपाक इनामदार , प्रताप वाबळे शेतकरी उपस्थित होते.