प्रतिनिधी :- कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत यंदाचा वाढदिवस साधेपणाने व समाजउपयोगी कार्यक्रम करत साजरा करण्याचे आव्हान रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यानुसार कुठं रक्तदान, तर कुठं वृक्षारोपण, तर कुठं लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याच प्रमाणे गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य अनेक ठिकाणी वाटण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कर्जत जामखेड विधानसभा चे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणीक साहित्य रोहित पवार यांना भेटून त्यांच्याकडे सुपूर्द केले व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पार्थ गालिंदे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस , ऋषी देवकाते पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक, शुभम ठोंबरे उपसरपंच ढेकळवाडी ग्रामपंचायत, आदित्य हिंगणे युवा नेते, शिवप्रसाद गाढवे उद्योजक व इतर मान्यवर उपस्थित होते. बारामती क्लब या ठिकाणी झालेल्या कार्यक्रममध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या ,चित्रकला बुक, पॅड, लहान मुलांच्या उजळन्या व इतर साहित्य देण्यात आले.