प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021
शेतकरी कृती समिती श्री सोमेश्वर सह साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत पॅनेल उभा करणार नाही असे श्री. सतीश काकडे यांनी आज निंबत येथे झालेल्या सभेमध्ये जाहीर केले
मागील काही वर्षांपासून श्री. अजितदादा पवार यांच्या विकासाच्या मुद्यांवर संवाद सुरू आहे. त्यांनी कायम विकासाच्या बाबतीत योग्य भूमिका घेतली आहे . त्यांनी समविचारी लोकांना घेऊन वाटचाल करणार आहे असे सांगितले . त्या अनुषंगाने तसेच कोरोना महामारीचा निवडणूक काळात उद्रेक होऊ नये. कारखाना प्रशासकीय निवडणूक खर्च टाळावा या उद्देशाने शेतकरी कृती समिती निवडणुकीत पॅनल उभा करणार नाही . याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी आव्हानं करण्यात आले आहे.