प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021

देऊळगाव रसाळ विविध कार्य. सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 09:00 वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये चेअरमन सौ. रोहिणी पंढरीनाथ रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.

संस्थेचे सचिव श्री. शंकर नाना रसाळ यांनी मागील सभेचा वृतांत वाचून दाखविला व मागील वर्षातील हिशोब , नफातोटा याला मान्यता देण्यात आली आणी पुढील वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले तसेच त्यासाठी संचालक मंडळास सहीचे अधिकारही देण्यात आले.

त्यावेळी बारामती दुध संघाचे संचालक श्री सुरेश रसाळ यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्यात यावेत व 2019 च्या कर्जमाफी यादीतील 49 शेतकऱ्यांना ऑनलाईन काही चुकांमुळे कर्जमाफी मिळाली नाही त्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न व पाठपुरावा करून त्या सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळून द्यावा लागेल असे सांगितले.

त्यावेळी आण्णासो वाबळे , नागेश रसाळ , लक्ष्मण वाबळे या सभासदानी कर्जमाफी यादीतील चुका दुरुस्ती करून सर्वसामान्य सभासदांना लाभ मिळवून द्या असे संचालक मंडळास सांगितले

त्यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन श्री . अंकुश रसाळ म्हणाले की आपण ऐ आर ऑफिस बारामती येथे जाऊन 49 सभासदांच्या कर्जमाफी साठी काही ऑनलाईन चुका झाल्या असतील तर दुरुस्ती करून त्यांना लाभ मिळवून देऊ व आपण नेहमी सभासदांच्या हिताचे काम संस्थेने केले पाहिजे आणी रुपये 2 लाखाच्या वरील कर्जमाफी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असे संचालकांना सांगितले.

त्यावेळी संचालक श्री. लालासो रसाळ , राजेंद्र खंडागळे , सोमनाथ चव्हाण , राजेंद्र रसाळ सर , उमेश वाबळे , भाऊसो लोंढे , राहुल वाबळे , अशोक कदम , दत्तात्रय रसाळ , संजय रसाळ , अमोल रसाळ , रामदास खोरे , नानासो खंडागळे आदी सभासद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *