कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क दौरा सुरू

प्रतिनिधी : ( दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ ) दि,27 – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 2021 – 2026 या कालावधीसाठी लागली असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभासद संपर्क दौरा सुरू झाला आहे. आज देऊळगाव रसाळ या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप , राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष श्री. संभाजी होळकर , कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. शैलेश रासकर , जिल्हा परिषद सदस्य श्री. भरत खैरे , कारखान्याचे संचालक श्री. गणेश चांदगुडे , दूध संघाचे व्हा. चेअरमन श्री. राजेंद्र रायकर , पंचायत समितीच्या सदस्या सौ. शारदा खराडे , दूध संघाचे माजी चेअरमन श्री. अनिल जगताप , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. ज्ञानेश्वर कौले ,राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष श्री. विक्रम भोसले , मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री. संपत जगताप , मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री. शोकातभाई कोतवाल , शेतकरी संघटना प्रवक्ते श्री. अशोक खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप म्हणाले की बाकीच्या कारखान्याच्या तुलनेत आपण एफ आर पी नुसार दर दिला असून पुढील काळातही कारखाना कायम सभासदाच्या हिताचेच पाऊल उचलेल , कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस जास्त असल्यामुळे गाळप क्षमता वाढवण्याचा विचार आहे. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. भरत खैरे म्हणाले की विकास कामाच्या जोरावर व सभासदांच्या हिताचे काम कायम करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक जिंकणारच. राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष श्री. राहुल वाबळे म्हणाले जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी जनाई योजना वरदान आहे . कारखान्याच्या माध्यमातून मदत करून अवर्तनास सहकार्य करावे. त्यामुळे या भागातील उसाचे क्षेत्र वाढेल व शेतकऱ्यांची सुद्धा आर्थिक प्रगती होईल . बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. दत्तात्रय लोंढे म्हणाले की ऊस गळपाच्या वेळेस जिरायत भागातील सभासदांना झुकते माप देऊन सहकार्य करावे

त्यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन श्री. अंकुश रसाळ , दुध संघाचे संचालक श्री. सुरेश रसाळ , उपसरपंच श्री. दत्तात्रय वाबळे , उमेश वाबळे , मोहन तात्या रसाळ , विजय भिसे , लालासो रसाळ , संजय वाबळे सर , तुकाराम तात्या कदम , संजय निंबाळकर , दिपक वाबळे , तानाजी रसाळ , प्रवीण खंडागळे आणी सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते . सूत्रसंचालन श्री शंकर रसाळ यांनी केले व आभार राजेंद्र रसाळ यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *