बारामती:- ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या सरपंच संघाचे अध्यक्ष आजीनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई यांच्या मार्गदर्शनाने मौजे कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील विद्यमान सरपंच उज्वलाताई दत्तात्रेय परदेशी यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे नवनिर्वाचित सरपंच क्षमता बांधणी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन ते यशस्वीरीत्या पूर्ण केले. यावेळी ग्रामपंचायत विकासा करता अनेक प्रशिक्षित असे शिक्षकाकडून सरपंचांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले, त्यामध्ये योगा सत्र, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य ,ई टेंडर, बंदित व अबंदित निधी , खेळ, क्रीडा, साहित्य, ग्राम स्वच्छता, कोविड-19 अशा विविध विषयवार s d बिराजदार, सचिन खलाटे, व अन्य प्रशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी उज्वाला परदेशी यांना प्रशिक्षण पूर्ण केलेबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. त्या वेळी त्या म्हणाल्या की गावचा विकास करणेकरता या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. तसेच शासन स्थरावरून सरपंच प्रमाणे उपसरपंच व सदस्य यांना सुद्धा प्रशिक्षण दिले पाहिजे, ग्राम विकासामध्ये त्याचा खारीचा वाटा असल्याने प्रशिक्षण मिळाल्यास गावचा विकास साधण्यास मदत होईल, यावेळी ग्राम संवाद सरपंच संघ परिवारातील मोहळ तालुका अध्यक्ष दिपक चव्हाण व अनेक सरपंच उपस्थीत होते.