बारामती दि. 22: पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व पणदरे, सोमेश्वरनगर, सुपे दुरक्षेत्रे तसेच पोलीस मदत केंद्र मोरगाव, या ठिकाणी ही रक्तदान शिबीर पार पडले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व पणदरे दुरक्षेत्र येथील रक्तदान शिबीराचे उद्धाटन अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पार पडले. मोरगाव, सोमेश्वर नगर व सुपे येथील उद्धाटन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
या पाचही ठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून वडगाव निंबाळकर येथे 300, पणदरे 200, सोमेश्वरनगर 200, सुपे 225 व मोरगाव येथे 150 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.