बारामती, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लसीकरण मोहिमेला हातभार म्हणून बारामतीमधील अमराई परिसरात पहिलेच लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कष्टकरी व रोजंदारीवर काम करणारे नागरिक आहेत, लसीकरणासाठी इतर केंद्रावर जाऊन, लाइन लावून, पूर्ण दिवसाचा वेळ खर्च होणे म्हणजे एक दिवसाचा रोजगार बुडणार या विचाराने अनेक नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत होते, परंतु घराजवळच लसीकरण केंद्र झाल्याने व सुटसुटीत नियोजनामुळे लगेच लस घेऊन वेळेची बचत होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन सदाशिव बापुजी सातव, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, मुख्याधिकारी महेश रोकडे,गटनेते सचिन सातव, शहर पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, आरोग्य सभापती सुरज सातव, नगरसेविका अनिता ताई जगताप, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, समिर चव्हाण, अमर धुमाळ, अतुल बालगुडे, डॉ राजेंद्र चोपडे, प्रा रमेश मोरे, आरोग्य निरीक्षक बा न प राजेंद सोनवणे, भंडार विभाग दुबे, शब्बीर शेख, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे, गौतम आप्पा शिंदे, नितीन बाबा मोहिते, राहुल दादा कांबळे, सचिन मोरे, कमलेश वाघमारे, आकाश दडस, नितीन थोरात, सागर सोनवणे, सनी जगताप, महावीर गायकवाड यांनी केले. यावेळी बोलताना आयोजक गणेश भाईजी सोनवणे यांनी सांगितले की, आज पहिल्या दिवशी शंभर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उद्यापासून लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *