प्रतिनिधी ( जावेद शेख ) :- समाजाच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य झिजवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 वी जयंती कोरोना महामारी मुळे अनोख्या ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला सुमारे 200 विद्यार्थी व पालक यांनी गूगल मीट द्ववारे आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर अण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी “कोरोना जनजागृती” यावर पथ नाट्य सादर केले. कर्मवीर अण्णांनी समाजातील उपेक्षित दुर्लक्षित समाज घटकांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी आयुष्य घालविले, महाराष्ट्राच्या आधुनिकीकरण, पुरोगामित्व यामध्ये रयत ने मोठी भूमिका बजावली आहे असे विचार प्रमुख वक्ते श्री.आभिमन वाघमारे यांनी व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थिनी वैष्णवी माने हिने विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुनिल साळवे यांनी केले. तर सूत्रसंचालन सीमा सोनवणे व सविता भालेकर यांनी केले.
कार्यक्रमाला श्री.अशोक (नाना )नवले (सदस्य , स्थानिक स्कूल कमिटी ) श्री.पांडुरंग सलवदे ( सरपंच, डोरलेवाडी) श्री नारायण कोळेकर (संचालक, भवानीनगर सहकारी साखर कारखाना ) श्री.नितीन शेडगे (सरपंच, झारगडवाडी) प्रमूख पाहुणे उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री. बळीराम खवळे यांनी मानले.