माळेगाव, प्रतिनिधी :- मळदच्या एकता महिला शेतकरी गटाने पटकविला पोषण थाळी स्पर्धेतील प्रथम पुरस्कार तसेच द्वितीय पुरस्कार सौ. लतिका गाढवे शारदानगर यांना देण्यात आला. तृतीय पुरस्कार संकल्प महिला बचत गट सांगवीच्या सौ बंडगर रेश्मा दत्तात्रय यांना देण्यात आला. त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली, त्यामध्ये सौ. वर्षा गायकवाड पनदरे, सौ. एम.डी. पवार पनदरे, आणि निलम मुळीक अंबिकानगर बारामती यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
एकता गटातील महिलांनी आपल्या शेतातील भाज्यापासून बानवलेली शेवगा पणाची भाजी, मोड आलेले कडधान्य उसळ, आळूची वडी, जवस करले चटणी, कोशिंबीर, लिंबू, अंबा लोणचे, खपली गव्हाची लापशी व सलेड ई ताट ठेवलं होते त्यामध्ये सौ. कल्पना प्रशांत शेंडे, सौ. स्वप्नाली सूरज होले, सौ. प्रीतम गावडे यांनी स्व्यपाक केला.
आज ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती, शारदा महिला संघ, पंचायत समिती बारामती आयोजित आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेला ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, श्री. नवले साहेब व ट्रस्टच्या एच. आर. सौ. गार्गी दत्ता यांनी भेट दिली व महिलांना मार्गदशन केले. श्री संतोष गोडसे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री सचिन खलाटे यांनी आभार मानले.