फेरेरो इंडिया प्रा. लि. बारामती व इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न

प्रतिनिधी (गणेश तावरे) :- फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये वेतनवाढ करार दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. सदर वेतनवाढ करार हा इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी यांच्यावर युनियनच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे १५ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्णतः आनंदी वातावरणात पार पडलाअसल्याचे अध्यक्षांनी यावेळी बोलताना सांगितले. या करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्य प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली .
करारावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री .बाळासाहेब डेरे, सचिव श्री. महेश काटे, उपाध्यक्ष श्री. महेश लकडे, कार्याध्यक्ष श्री शैलेश बोरकर, खजिनदार सौ. शितल शेंडे सहसचिव श्री. संतोष गवळी, कार्यकारणी सदस्य श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. मनोज भोसले, श्री.सचिन पिंगळे सौ. अर्पणा रंधवे, फरजाना शेख , तसेच कंपनीच्या वतीने प्लँट हेड श्री. डॅनिएल पेरोटिनो, एच. आर. हेड श्री उमेश दुगानी, सी एफ ओ श्री. कुंदन पटेल, कंट्री एच. आर. हेड श्री.फाबीओ सर, फायनान्स हेड श्री प्रशांत पोतनीस, रिजन इंडिया रिवॉर्ड मॅनेजर श्री जिमी गांधी, आय. आर. मॅनेजर श्री रमेश हिरेमठ, वरिष्ठ कार्यकारी एच. आर. श्री योगेश मगदूम यांनी सह्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *