पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली संघटनेचा पदाधिकारी निवड कार्यक्रम संपन्न

बारामती, प्रतिनिधी :- पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, भारत. रजि.नई दिल्ली, संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील यांच्या सूचनेवरून, बारामती तालुका बारामती येथे 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संघटनेची सर्व साधारण सभा व नव पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जी एम भगत, यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी पोलीस मित्र संघटनेच्या बारामती तालुका अध्यक्षा रोहिणीताई खरसे -आटोळे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. बारामतीत खालील प्रमाणे पदाधिकारी यांची नावे बारामती तालुका कायदेशीर सल्लागार ॲड. सौ माया पालेकर, सौ.स्मिता शिंदे उपाध्यक्ष बारामती तालुका, सतीश गावडे बारामती तालुका कार्याध्यक्ष, संकेत बाळासाहेब गावडे बारामती तालुका सचिव, सौ प्रियांका नितीन खारतोडे बारामती शहराध्यक्ष, गौरी गावडे पुरंदर तालुका महिला अध्यक्ष, ॲड. मोनिका निकाळजे दौंड तालुका कायदेशीर सल्लागार, या सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे बारामती तालुका मार्गदर्शक शिवाजीराव बीबे हे उपस्थित होते. तसेच जि एम भगत यांनी पोलिस मित्र संघटनेचे ध्येय धोरणे उद्दिष्ट सर्व पदाधिकारी व सभासद सदस्यांना सांगितले संघटना फक्त पोलीस बांधवांसाठी कार्यरत नसून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सहकार्य मदतीसाठी आहे. समाजातील तळागाळातील लोकांना संघटनेच्या वतीने मदत व मार्गदर्शन केले जाईल असे आपल्या भाषणात भगत यांनी सांगितले, कार्यक्रमाप्रसंगी आज समाजामध्ये होणारे महिलांवरील अन्याय अत्याचार आणि वारंवार बलात्काराच्या केसेस आपल्याला रोज ऐकायला मिळत आहेत, ह्या विषयावरती श्री भगत यांनी सांगितले की संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून आंदोलन करण्याची गरज आहे. आज महिला यांनी पुढे येऊन आवाज उठवून आरोपीस कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरकार यांना संघटनेच्या वतीने करण्यात यावी असे जी एम भगत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *