‘कृषिदूता’ कडून बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

माळेगाव दि.19(प्रतिनिधी गणेश तावरे ) माळेगाव खु .ता बारामती येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ,रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित
‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ अंतर्गत कृषिदूत श्रेयश यशवंत गाडेकर यांनी उपस्थितांना बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पेरणीपूर्वी बियाणे योग्य पद्धतीने तपासून त्यावर प्रक्रिया केल्यास हमखास उत्पादनात वाढ होते. आणि बियांचा दर्जा व उगवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते,तसेच उगवलेल्या बियाण्यांपासून उत्पादनाची हमी मिळते. याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
यासाठी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी.कोरटकर प्राचार्य आर.जे.नलवडे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस.एम एकतपुरे,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर अडत
प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *