MHT-CET परीक्षेत क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी 2021 मध्ये एम एचटी- सीईटी या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे विद्यार्थी अव्वल आले आहेत यामध्ये ऋषिकेश माने 99.52 % गुण घेऊन महाराष्ट्रात 933 वा क्रमांक याने मिळवला आहे

नीरज कारंडे याने 99.31% गुण मिळवून हा विद्यार्थी महाराष्ट्रात 1332 वा आला आहे या यशाचे कौतुक करीत असताना क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे संचालक काळे सर व घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

पुणे जिल्ह्यामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चा निकाल हा दरवर्षी चांगला लागत आसतो याहीवर्षी ॲकॅडमीने ही यशाची परंपरा अबाधित राखून आपले नाव गुणतालिकेत अव्वल ठेवले आहे यावर्षी MHT CET या परिक्षेत अकॅडमीचे 28 विद्यार्थी 90 % च्या पुढे आहेत.

विद्यार्थ्यांबरोबरच अकॅडमी चे देखील कौतुक पालक करताना पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *