About Us

बारामती आणि परिसरातील बातम्यांचा अचूक आढावा घेण्यासाठी 15 ऑगस्ट 2019 पासून साप्ताहिक शेतकरी योध्दा हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आले. बातम्या देण्याची वेगळी शैली, सकारात्मक बातम्या व बातमी मागची बातमी देण्याच्या पद्धतीमुळे साप्ताहिक शेतकरी योद्धा ने अल्पावधीतच वाचकांच्या मनात घर केले आहे. शेतकरी योध्दाचा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व वाचकांची गरज लक्षात घेता, शेतकरी योद्धा हे आपल्या बातमीपत्रा मध्ये बदल करत गेले. दिनांक 25 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी योध्दा हे डिजिटल वेब पोर्टलच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला आले आहे. बारामती, दौंड, इंदापूर, फलटण व परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी www.shetkariyoddha.com हे गुगल वर सर्च करून आपण रोजच्या बातम्या पाहू शकता.
कृषी पत्रकारितेचे शिक्षण घेऊन संपादक योगेश नामदेवराव नालंदे यांनी शेती, सामाजिक, कला, राजकीय, तसेच शासकीय क्षेत्रातील सर्व घडामोडींचा आढावा घेत वाचकांची गरज ओळखून त्या त्या क्षेत्रातील साहित्य प्रसारित करत आहेत.