श्री गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे-मुख्याधिकारी महेश रोकडे .

बारामती, दि. 17: अनंत चतुदर्शी रोजी श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करण्याबाबतच्या मागदर्शक सूचना मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद, यांनी जारी केल्या असून ‘श्री’ च्या विसर्जन मिरवणूका काढू नयेत, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. बारामती नगरपरिषदेमार्फत गणेश विसर्जनावेळी पुढील मार्ग दर्शक सुचनांचे पालन करावे. ‘श्री’ चे विसर्जन मर्यादीत जल्लोषासह शक्यतो घरच्या घरी करावे. ‘श्री’ च्या विसर्जन मिरवणूका काढू नयेत, तसेच पारंपारिकरित्या विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. कोरोना प्रार्दुभावामुळे ‘श्री’चे विसर्जनावेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ‘श्री’ चे विसर्जनावरुन आल्यावर हात साबणाने धुवावेत. ‘श्री’ चे विसर्जना वेळी लहान मुले व वृध्दांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. ‘श्री’ चे विसर्जन करते वेळी गणेश भक्तांनी सुरक्षित अंतर ठेवावे. सर्व गणेशभक्तांनी त्यांच्याकडे जमा झालेले निर्माल्य व पूजूचे सहित्य निर्माल्य कुंडयामध्ये जमा करावे. प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील 25 ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभाची आणि खास विसर्जनाकरीता तयार केलेल्या 15 फिरत्या विसर्जन रथांची देखील व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. सदरील विसर्जन रथ सकाळपासून शहरांतून फिरुन मूर्ती संकलन करणार आहेत. तरी सदरहून ठिकाणीच श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. शहरातील कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था पुढीलप्रमाणे केली आहे:-
1) धो.आ. सातव शाळा, जगताप मळा,
2) बा.न.प. शाळा क्र.2, कसबा, 3) महात्मा फुले समाज मंदिर पानगल्ली, मंडई
4) क्षत्रिय नगर समाज मंदिर, टकार कॉलनी,
5) शाहू हायस्कूल पाटस रोड,
6) आर एन आगरवाल टेक. हायस्कूल,
7) म.ए.सो. हायस्कूल, बारामती, 8) रमाई माता भवन, टेलीफोन ऑफिस समेर आमराई,
9) मूक बधीर शाळा, कारभारी नगर कसबा,
10) जि.प. प्राथमिक शाळा, शारदानगर,
11) चिंचकर शाळा, सपनानगर, 12) जि.प. प्राथमिक शाळा तांदूळवाडी,
13) जि.प.शाळा, जळोची क्षेत्रिय कार्यलयामागील,
14) सुर्यनगरी, मंडई शेजारील आंगणवाडी,
15) कविवर्य मोरोपंत शाळा, श्रीरामनगर,
16) देसाई इस्टेट जि.प.शाळा, 17) ढवाण वस्ती शाळा, मोरगाव रोड,
18) रयत भवन मार्केट यार्ड,
19) गावडे हॉस्पिटल शेजारी ,देवळे ईस्टेट
20) विद्या प्रतिष्ठाण प्राथमिक शाळा रुई ग्रामीण हॉस्पिटल शेजारी,
21) जि.प.शाळा जुनी सातव वस्ती, माळेगाव रोड,
22) जि.प.शाळा रुई,
23)बा.न.प.शाळा क्र.3 सिध्देश्वर गल्ली,
24) बा.न.प.शाळा क्र. 5 शारदा प्रांगण
25) फलटण रोड, राजगड हाईटस्, गाळा क्रृ 4, 5 निलम पॅलेस चौक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *